---Advertisement---
जळगाव : शेतीची मशागत करत असताना रोटावेटर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याला जागीच प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मशिनमध्ये अडकून चिरडल्यामुळे ७० वर्षीय शेतकरी रक्तबंबाळ झाला होता. भुसावळच्या विल्हाळे शेत शिवारात ही अंगारचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
कचरू उघडू सुरवाडे (वय ७०, रा. विल्हाळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतात मशागतीचे काम करीत होते. या कामासाठी त्यांनी ट्रॅक्टरला रोटर मशीन जोडून काम सुरू केले. मात्र, मशागत करत असताना अचानक ट्रॅक्टरवरील तोल गेला. ते खाली पडले व थेट रोटरमध्ये अडकले. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १८) दुपारी ३:३०च्या सुमारास घडली. या अपघाताने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
---Advertisement---
अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वरणगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत सुरवाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.