शेतकऱ्यांनो, सावधान! बनावट नोटांच्या माध्यमातून होतेय फसवणूक

Crime News : शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अनेकदा वाचले असलेच अशीच एक घटना बीडमध्ये समोर आली आहे. बीडच्या डोंगरण येथील शेतकऱ्याची बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. दोन हजारांच्या बनावट नोटा देत पाठ आणि बोकड विकत घेऊन नबाजी घोडके या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
व्यापारी असल्याचे सांगून दोन जणांनी शेतकरी असलेल्या नबाजी घोडके यांच्या बरोबर व्यवहार केला. या व्यवहाराच्या माध्यमातून पाठ आणि बोकड विकत घेण्याची बोलणी त्यांच्यांत झाली. अखेर दोन्हींसाठी साडे नऊ हजारात हा व्यवहार ठरला. पण त्यांना २ हजार रूपयांच्या चार आणि पाचशेच्या तीन बनावट नोटा दिल्या. घोडके यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.