तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। पनीर टिक्का हा जवळपास सर्वानाच आवडतो. पण तुम्ही कधी उपवासाचा पनीर टिक्का खाल्ला आहे का? हा घरी बनवायला खूप सोप्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहीत्य
दही, पनीर, बटाटा , कोथिंबीर, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, लिंबू, लोणी, काळं मीठ चवीनुसार.
कृती
सर्वप्रथम कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घ्या. बटाटा आणि भोपळी मिरचीचे स्क्वेअर तुकडे कापून घ्या. पनीरचेपण मोठे स्क्वेअर तुकडे कापा. अता दह्यात मीठ, लिंबाचा रस, पनीर, वाटण आणि भाज्या मिसळून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर स्टिकमध्ये पनीर, भोपळी मिरची आणि बटाट्याचे तुकडे लावा. वरून लोणी लावून मायक्रोवेवमध्ये शेकून घ्या. आणि सर्व्ह करा उपवासाचा पनीर टिक्का.