उपवासाचे थालीपीठ रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। आज संकष्टी चतुर्थी म्हणजेच बऱ्याच जणांचा उपवास असेल. पण उपवासाला वेगळं काय करावं असा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही उपवासाचे थालीपीठ बनवू शकता. यासाठी काय साहित्य आणि कृती आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे , साबुदाणा शेंगदाण्याचे कूट ,हिरव्या मिरच्या, तूप, मीठ

कृती
सर्वप्रथम उपवासाचे थालीपीठ’ बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेला बटाटा बारीक किसून घ्यावं यानंतर मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. भाजलेला साबुदाणा , शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या मिरच्या, किसलेला  बटाटा , चवीनुसार मीठ एकत्र करावे. तयार झालेल्या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ मळल्यानंतर ते थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे. एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे. थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर पाच मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूला करावे.