अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर! बसने चौघांना चिरडले

अमरावती । राज्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानासमोर आज सिटी बसने चार जणांना चिरडले. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली.

या अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. तिन्ही जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली. सध्या घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे. या अपघातामध्ये प्रीतम गोविंद निर्मळे (९ वर्षे) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला. तर नर्मदा निर्मळे (६० वर्षे), वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे निर्मळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.