---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव : भरधाव दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चाळीसगाव शहरातील कोदगाव बायपास चौफुलीवर आज सकाळी झाला. सुदाम पवार आणि श्रावण माळी असे मृत व्यक्तींचे नावे असून, दोघेही स्थानिक रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील कोदगाव बायपास चौफुलीवर आवाज सकाळी दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोरधडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला असून, पिकअप उलटून रस्त्यावरच आडवी झाली आहे.

घटनेनंतर पिकअपचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---