---Advertisement---

मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात; ४ वर्षीय कार्तिकचा करुण अंत

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।२३ फेब्रुवारी २०२३। मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक ज्ञानेश्वर सुतार असं मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुतार हे आपल्या लहानग्यासोबत कामानिमित्त दुचाकीवरून सोमाटणे गावाच्या दिशेने निघाले होते. त्यांचा मुलगा कार्तिकही त्यांच्यासोबत होता. त्याचवेळी वडगाव ते तळेगाव फाटा या दरम्यान समोरून एक ट्रक वेगात येत होता यामध्ये दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. ट्रक आणि दुचाकीच्या धडकेनंतर कार्तिक सुतार हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि तो चाकाखाली चिरडला गेला. या दुर्घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला आणि वडील ज्ञानेश्वर हे जखमी झाले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा तपास करण्याचे काम सुरू आहे. कार्तिकच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेनं मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment