तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नबा दास हे ब्रजरानगर येथील बीजू जनता दलच्या कार्यालयचे उद्घाटन करणार होते. वाटेमध्ये गांधी चौक आला. त्यावेळी ते कारमधून उतरून पायीच पक्षाच्या कार्यालयाकडे निघाले होते. त्याच वेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या. नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे. तिथून त्यांना भुवनेश्वरला उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाबा दास यांच्यावर गोळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असणारे एएसआय गोपाळ दास यांनी झाडली आहे. गोपाल दास यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या आहेत. नाबा दास गाडीततून उतरताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्राथमिक तपास सुरु झाला आहे. आरोपी एएसआय गोपाळ दास फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.