---Advertisement---

ट्रक-ऑटोमध्ये भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। मधेपुरा जिल्ह्यात आज सकाळी ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण टक्कर झाली. या भीषण अपघातात ट्रकच्या धडकेनं ऑटोचा चक्काचूर झाला. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जखमी झालेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मधेपुरा जिल्ह्यात आज सकाळी चौसा पोलीस स्टेशन हद्दीतील घोशाई टॉवरजवळ सकाळी ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण टक्कर झाली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेनं ऑटोचा चक्काचूर झाला. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेनं रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. ऑटोमध्ये एकूण नऊ जण होते, हे सर्व लोक सहरसा जिल्ह्यातील दुर्गापूर भट्टी येथून भागलपूरच्या महादेवपूर घाटाकडं ऑटोनं गंगा स्नानासाठी जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इथं लोकांची गर्दी जमू लागली होती. स्थानिक लोक मृतदेह बाहेर काढू देत नव्हते. त्यामुळं रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नसल्याचं लोकांनी सांगितलं.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment