---Advertisement---
बोदवड : शेतीचा वाद विकोपाला जाऊन पिता-पुत्राला १६ जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करत जखमी केले. बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी अफसर खान अनवर खान पठाण (वय ३०) यांची गट क्रमांक ४७३ मध्ये शेती असून, शेतीच्या वहिवाटवरून वाद सुरू आहे. याबाबत त्यांनी वहिवाटबाबतची तक्रार पोलिसात नोंदविली आहे.
याबाबतचा राग शेजारी शेत असलेल्या आरोपींना आला व त्यांनी त्यातून फिर्यादी अफसर खान व अन्वर खान पठाण या पिता-पुत्राला मारहाण केली. या मारहाणीत एकाचा उजवा हात व डावा पाय फॅक्चर झाला आहे. आरोपींमध्ये गयासखान यावरखान पठाण, भिकान खान रोशन खान पठाण, रोशन खान यावरखान पठाण, गुलाब खान दिलावर खान पठाण, रईसखान यावरखान पठाण, चांद खान यावर खान पठाण, अनिसखान अजीज खान पठाण, शेरखान अल्खांन पठाण, युसुफखान हाजेखन पठाण, इकबालखान दिलावर पठाण, एजाज खान इकबाल खान पठाण, सईदाबी पठाण, रशिदाबी साजेखान पठाण, असमाबी गयासखान पठाण, सज्जोबी चांद खां पठाण, सरताजबी इकबाल पठाण यांचा समावेश आहे.
मारहाणीची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. गुन्हा नोंद क ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर प्रथम खबर क्रमांक १५५/भारतीय न्याय संहिता ११८ (२) १८८ (२) १९१(१) ३५२, ११५ (२) ३५१ (२) ३५१(३) या प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. एकूण १६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे.