”गाणे बंद करा, अभ्यास करतेय”, संतापलेल्या पित्याने मुलीसह पत्नीस केली मारहाण

---Advertisement---

 

जळगाव : आधुनिक युगात अबालवृद्धांमध्ये मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलकडे एक मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. यात काही मंडळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात असे दिसून येत आहे. काही जण मनोरंजन करण्यासाठी चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे याकरिता मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम देखील समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव शहरात घडला आहे. मोबाईलवरील गाणे बंद केल्याचा राग येऊन एका बापाने स्वतः च्या मुलीला व पत्नीला जखमी केल्याची अमानुष घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी व मुलीला मारहाण करण्याची अमानुष घटना शुक्रवारी (१५ ऑगस्ट )रोजी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध शनिवारी (१६ ऑगस्ट) रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान पाटील हा मद्यपान करून घरी आला आणि त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे लावले. त्यावेळी त्याची अकरावरीत शिक्षण घेणारी मुलगी अभ्यास करीत होती. तिने गाणे बंद करा, अभ्यास करतेय असे सांगितले. परंतु, तिच्या वडिलांनी तिचे ऐकले नाही. यामुळे, मोबाईलवरील सुरु असलेले गाणे मुलीने स्वतः च बंद केले. या क्षुल्लक कारणावरून समाधानाचा राग अनावर झाला.

त्याने काचेचा ग्लास फोडून पत्नी जागृती पाटील हिला मारहाण करण्यास प्रारंभ केला. आईला मारहाण होताना पाहून मुलगी प्राप्ती तिला सोडवण्यासाठी पुढे आली. तेव्हा पित्याने कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारून तिला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलीला मारहाण केल्यानंतर समाधान पाटील हा आपले मूळ गाव कल्याणेहोळ येथे पळून गेला. तिथे त्याने आपल्या आई-वडिलांकडे “या दोघींचा खून करणार” असे सांगितले असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पत्नी जागृती पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी समाधान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---