रायगड । जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पित्याने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपीला अटक
पीडित मुलीने पोलिसांना आपल्या वडिलांच्या पाशवी कृत्याविषयी माहिती दिली. तिच्या तक्रारीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे.
पोलीस अधिकारी तपासात गुंतले
महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. पित्यानेच असा अमानवी कृत्य केल्याने समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
पीडितेला न्यायाची प्रतीक्षा
संपूर्ण समाज या घटनेचा निषेध व्यक्त करत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.