तरुण भारत लाईव्ह ।१२ फेब्रुवारी २०२३। टाटा मोटर्सने स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही आणली आहे. आता भविष्यात आपली मायक्रो एसयूव्ही पंचला सुद्धा इलेक्ट्रिक व्हेरियंट मध्ये आणण्याची तयारी केली जात आहे. या कारचे फीचर्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
टाटा मोटर्सने काही वर्षापासून एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार जवळपास सर्वच सेगमेंट मध्ये आणण्याची घोषणा केली आहे. ज्यात अल्ट्रोज ईव्ही, हॅरियर ईव्ही, कर्व ईव्ही सोबत अविन्या ईव्ही आहे. टाटा पंच इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा Ziptron टेक्नोलॉजी पाहायला मिळू शकते. यात 55kW ची इलेक्ट्रिक मोटर आणि 26kW ची लिथियम आयन बॅटरी पाहायला मिळू शकते. टाटा पंच ईव्हीचे अनेक व्हेरिंयट असू शकते. यात पेट्रोल मॉडल प्रमाणे सर्व आवश्यक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळू शकतात.
टाटा पंच इलेक्ट्रिकला फास्ट चार्जिंग फीचर सोबत इंडियन मार्केटमध्ये आणले जावू शकते. याची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. याची थेट टक्कर अपकमिंग महिंद्रा केयूव्ही १०० इलेक्ट्रिकशी होईल. २०२५ पर्यंत टाटा मोटर्सच्या १० इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतील.तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिक चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.