---Advertisement---

सलग तिसऱ्या वर्षी फेब्रुवारी ठरला सर्वांत ‘उष्ण’

---Advertisement---

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष उन्हाळ्यास सुरुवात होत असली, तरी एक महिना आधीच उन्हाच्या झळा बसत आहे. मागील तीन वर्षांपासून फेब्रुवारी महिना सतत सर्वांत उष्ण ठरत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर फेब्रुवारी उष्ण असल्याचे ‘युरोपियन कोपर्निकस क्लायमेंट चेंज’ या ब्रिटनच्या संस्थेने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने निवेदनात म्हटले की, फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमानात १.५९ अंश सेल्सिअसची वाढ नोदविण्यात आली. यापूर्वी फेब्रुवारी २०२४, फेब्रुवारी २०२३, आणि फेब्रुवारी २०१६ मध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सलग तीन वर्षे फेब्रुवारी महिना उष्ण राहिला आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारीत १.५९ इतके अधिक तापमान नोंदविण्यात आले. १८५० च्या फेब्रुवारीतही अशाच प्रकारचे तापमान नोंदविण्यात आले होते. वाढते तापमान चिंतेचा विषय आहे. मध्य आणि उत्तर भारतात सरासरीपेक्षा तापमान सहा अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे गहू तसेच हरभरा, वाटाणे, मका, बार्ली, जवस आणि मोहरीसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

जागतिक तापमान सरासरीपेक्षा अधिक
जागतिक पातळीवर पृष्ठभागाजवळील सरासरी तापमान १३.३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. १९९१ ते २०२० दरम्यानच्या फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानाची तुलना केल्यास या वर्षी फेब्रुवारीतील सरासरी तापमान ०.६३ अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी, फेब्रुवारी २०२४ हा आतापर्यंतचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी होता आणि २०१६ हा दुसरा सर्वांत उष्ण फेब्रुवारी होता. समुद्रातील बर्फातही विक्रमी घट झाली असल्याचे ‘युरोपियन कोपर्निकस क्लायमेंट चेंज’ संस्थेने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment