बापरे! तपासणी कक्षातून महिला डॉक्टरची लॅपटॉप असलेली बॅग लंपास

---Advertisement---

 

धुळे : शहरातील मोराणे येथे असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्षातून एका महिला डॉक्टरची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगेत लॅपटॉप, डेस्सा कीट, वॉलेट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती, ज्याची एकूण किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात डॉ. अश्विनी समीप बंब (वय २८, रा. पुणे, सध्या साईप्रेरणा अपार्टमेंट, साक्री रोड, धुळे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डॉ. बंब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ तारखेला सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी आपली लॅपटॉपची बॅग एसीपीएम डेंटल कॉलेजच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्षात ठेवली होती. याच दरम्यान, अंदाजे ६० वर्षाच्या निळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ही बॅग चोरून नेली.

चोरीला गेलेल्या सामानाम लॅपटॉप, १ लाख २० हजार रुपयांचे डेस्सा प्लास्टिक बॉक्समधील साहित्यसह आधारकार्ड, पॅनकार्ड, क्रेडिट कार्ड व वॉलेट यांचा समावेश होता. या चोरीमुळे डॉ. बंब यांचे मोठे नुकसान झाले आहे.

डेंटल कॉलेजमधील महिला डॉक्टरची २ लाखांची बॅग लंपास; लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे चोरीलाया घटनेची तक्रार मिळाल्यानंतर, धुळे तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक खालीदा सय्यद करत आहेत. पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---