---Advertisement---
राज्यात बेरोजगारी, एकटेपणा, कौटुंबिक समस्या, दारूचे व्यसन आणि आर्थिक समस्या आदींमुळे आत्महत्या वाढत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर ४ समोर येत आहे. कॅम्प नंबर ४ च्या रोमा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत एका महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णलयांत ती मरण पावली.
प्रत्यक्षदर्शींनी ती महिला उडी मारण्यापूर्वी देवाची प्रार्थना करीत असल्याचे दिसून आले. यानंतर तिने उडी मारली. ही महिला छतावरून उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना दुपारी १२:३० च्या सुमारास घडली. उडी मारणाऱ्या महिलेचे नाव सरिता खान चांदणी आहे,
भाडेकरू महिलेने सरिता खान चांदणी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. छतावरून उडी मारत असलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचे बोलले जात आहे. शहरातील एका व्हाट्सअप गृपमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याने तिचे अनेक व्हिडीओ शेअर केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यात तिची मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती. . यासंदर्भांत ती विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनला गेली होती.
स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे की, सरिता ही लढाऊ वृत्तीची महिला आहे. ती इतक्या टोकाची भूमिका घेऊ शकत नाही. विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस प्रत्येक दृष्टिकोनातून तपास करत असल्याचे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले. माहिती देताना उपपोलिस आयुक्त सचिन गोरे म्हणाले की, सरिताने तिच्या ऑफिसच्या मागे असलेली खोली एका महिलेला भाड्याने दिली होती. खोली रिकामी करण्यावरून बुधवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर महिलेने सरितावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
सरिता हिरली फाउंडेशन नावाची संस्था चालवत होती. ती उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या स्वच्छतेचे काम करायची. वायू आणि जल प्रदूषणाविरुद्ध काम केल्यामुळे तिला अनेक लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला.