फेंगशुई टिप्स… ‘या’ उपायांनी घरात निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा

तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। वास्तुशास्त्र म्हणजेच फेंगशुई घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवते. वास्तुशास्त्राप्रमाणे, लोक त्यांच्या घरात फेंगशुईशी संबंधित उत्पादने आणि वस्तू वापरत आहेत. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, घरामध्ये फेंगशुईशी संबंधित सकारात्मक गोष्टी जीवनात शुभ प्रभाव आणतात आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढवतात. फेंगशुईनुसार, जर तुमचे जीवनही अनेक समस्यांनी वेढलेले असेल, Feng Shui Tips तर तुम्ही फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय देखील करून पाहू शकता आणि जीवनातील समस्यांवर मात करू शकता. या उपायांबद्दल जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल आणि पैशाची कमतरता तुमचा आनंद हिरावून घेत असेल तर घरात बांबूचे रोप लावा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, बांबूची वनस्पती संपत्ती आकर्षित करते. घराच्या दिवाणखान्यात फेंगशुई बेडूक दक्षिण-पूर्व दिशेला ठेवल्याने व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही. त्यांना घरात ठेवल्याने सौभाग्य वाढते तसेच करिअरमध्ये प्रगती होते.

घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार जर लाफिंग बुद्धाला नियमानुसार ठेवले तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. सतत मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या नोकरी-व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यासाठी घरात एक सुंदर विंड चाइम लावा. यामुळे व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.

माणसाला प्रगतीचा नवा मार्ग मिळतो. व्यवसायात प्रगती करायची असेल तर लाफिंग बुद्धाची मूर्ती कामाच्या ठिकाणी दोन्ही हात वर करून ठेवा. हा फेंगशुई उपाय व्यवसायात लवकरच नफा मिळवून देईल.