---Advertisement---

BBC विरोधात गुन्हा दाखल, काय प्रकरण?

---Advertisement---
नवी दिल्ली : ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कंपनी (बीबीसी) विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी खटला दाखल केला आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ईडीने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना एका कॉन्फरन्समध्ये बसवून कार्यालयातील संगणक आणि अन्य यंत्रणांची तपासणी करण्यात आली होती. प्रायसिंग नॉर्मचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप बीबीसी विरोधात आहे. कंपनीला होणारा नफा दर्शवितानाही फेरफार झाला असल्याचे सांगितले जात आहे.
 
ईडीच्या सर्वेक्षणावेळी नेमकं काय घडलं होतं?
बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने कागदपत्रांची तपासणी केली आहे. बीबीसीवर आर्थिक अनियमितता, ट्रान्सफर प्राइसिंग, मोठ्या प्रमाणात नफा वळविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर खात्यातर्फे सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी बीबीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती घेतल्याचेही समजते. दिल्ली आणि मुंबई कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर बीबीसीने प्रतिक्रिया दिली. बीबीसी पूर्ण सहकार्य करत असून या परिस्थितीतून लवकरत मार्ग निघेल, असे त्यांनी म्हटले होते.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment