सोने – चांदीचे दागिने विक्रेत्यांवर गोळीबार, आरोपींना परराज्यातून अटक

---Advertisement---

 

धुळे : धुळे येथील सागर चौकात पिस्तुलातून गोळीबार करुन सोन्याचे दागिने लुटून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा कारनामा उघड केला. याप्रकरणी परराज्यातील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या लूट प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई येथील सोने-चांदीचे व्यापाऱ्याचे विक्री प्रतिनिधी विनय कुमार जैन व त्याचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी हे दोघे बसने धुळ्यात दाखल झाले. याच वेळी हेल्मेट व मास्क घातलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार करत दहशत निर्माण केली. यानंतर ३५०० ग्रॅम सोन्याचे दागिने व पावत्या असलेली बॅग हिसकावून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल्स व टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासाने आरोपींना ताब्यात घेण्याच्या हालचालींचा वेग मिळाला. तत्पूर्वी चोरट्यांनी लूट करण्यापूर्वी दोन दिवस धुळ्यात थांबून रेकी केल्याचेही उघड झाले आहे.

तपासात आरोपी प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. मोहम्मद शहरेवार मोहम्मद इबरार खान आणि दिलशान इमरान शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते मुंबईत ओला-उबर टॅक्सी चालवत असल्याचेही समोर आले. गुन्ह्यानंतर ते उत्तर प्रदेशात पळून गेले होते. तेथे अन्य खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातही त्यांन अटक झाली होती.

प्रतापगढ पोलीस व न्यायालयाच्या सहकार्याने धुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ लाख ५१ हजार ७०० रुपयांचे, एकूण २६२.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---