तरुण भारत लाईव्ह न्युज सावदा : शहरात प्रथमच राज्यस्तरीय केळी परीषदेचे आयोजन रविवार, 23 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृहात करण्यात आल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत दिली. राज्यात एकरी तीन स्टोन पेक्षा अधिक उत्पादन घेणार्या केळी उत्पादक शेतकर्यांचा या परीषदेत सन्मान करण्यात येणार आहे. परीषदेत केळी पिकाबाबत विविध स्तरांवरील माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
केळी तंत्रज्ञानाविषयी होणार मार्गदर्शन
केळी परीषदेत महाराष्ट्रातील केळी शेतीचे आजचे चित्र सर्वाच्या नजरेसमोर आहे. केळी शेती करणार्या शेतकर्यांची आजची स्थिती नाजुक असून अवकाळी पाऊस, गारा, सीएमव्ही वायरस, बोगस रोपे, बोगस औषधे तसेच विमा कंपन्यांनी व व्यापार्यांनी चालवलेली शेतकर्यांची पिळवणूक या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केळी शेतीतील विचारवंत शेतकरी पूरक उद्योजकांनी एकत्रीत येऊन या परीस्थितीवर चर्चा करून त्याचे कारण शोधत उपाययोजना करण्यासाठी परीषद होत असल्याचे चव्हाण म्हणाले. केळी परीषदेत आधुनिक केळीतील तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केळी पीक रोग नियंत्रण व सेंद्रीय शेतीबाबत प्रशांत नाईकवाडी तसेच मार्केटींग मॅनेजर नंदलाल वसेकर निर्यातक्षम केळी व सुक्ष्म अन्न द्रव केळीला महत्व याविषयी मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रातील सर्व केळी उत्पादक शेतकर्यांनी केळी परीषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण, राज्य उपाध्यक्ष डॉ.राहुल बच्छाव पाटील, विजयसिंह गायकवाड, तज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे, रवींद्र डिगे, नामदेव वलेकर, कुबेर रेडे पाटील, राज्य समन्वयक सचिन कोरडे, जळगाव जिल्हाध्यक्ष राजेश नवाल, रावेर तालुकाध्यक्ष केतन पाटील यांनी केले आहे.