---Advertisement---

पाच हरणांची शिकार; चाळीसगावातून सुसाट वाहनाने निघालेल्या शिकाऱ्यांचा वनविभागाकडून धुळेपर्यंत पिच्छा

---Advertisement---

चाळीसगाव : हरणांची शिकार करून वाहनाने सुसाट निघालेल्या शिकाऱ्यांकडे पाच हरीण मृतावस्थेत आढळून आली. चाळीसगाव वनविभागाच्या पथकाने थेट धुळे शहरापर्यंत पाठलाग केला. त्यामुळे शेवटी शिकाऱ्यांनी गाडी सोडून पळ काढला. त्यांच्या वाहनात ही मृत हरीण आढळून आली. यात दोन नर तर तीन मादींचा समावेश आहे.

जंगलातील हरणांची शिकार करून काही जण त्यांची मांस विक्री करीत असल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाला मिळाली होती. यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी पथकासह बिलाखेड गावाजवळ सापळा रचला.

छत्रपती संभाजीनगरहून धुळेकडे क्र. एमएच ४१ सी ९६९१ ही चारचाकी गाडी थांबली नाही. त्यामुळे संशय बळावला आणि पथकाने गाडीचा थेट ५० किमीपर्यंत पाठलाग केला. हे लक्षात आल्यानंतर शिकाऱ्यांनी धुळ्यानजीक गाडी थांबविली आणि वाहनातील पाच जण कार सोडून फरार झाले.

हरणांच्या शिकारीचे मोठे रॅकेट

दरम्यान, हरणांच्या शिकारीचे हे मोठे रॅकेट असून, याचे लागेबांधे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असावेत, असा कयास आहे. फरार झालेल्या शिकारींचा मालेगाव, धुळे आणि चाळीसगाव परिसरात शोध घेतला जात आहे, अशी माहिती चाळीसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment