---Advertisement---
जळगाव : जळगाव : पाळधी ते तरसोद बायपासने उद्घाटन होण्यापूर्वीच दोन बळी घेतल्याची घटना ताजी असताना, जिल्ह्यात पुन्हा एकाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला असून, या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची बस धरणगावहून बाभळगावकडे जात होती. दरम्यान, बस सुसाट वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहे.
कंडक्टरसह काही प्रवाशी आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर
या अपघाताअंतर कंडक्टरसह काही प्रवाशी आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडले. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्घाटनापूर्वीच पाळधी-तरसोद बायपासने घेतले दोन बळी
गुजरातमधील मोरबी येथून खाकीनाडा (आंध्र प्रदेश) येथे टाईल्स घेऊन जाणारा ट्रक (क्र. एपी ३९, युएफ ३५९९) पाळधी ते तरसोद बायपासवरून जात असताना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. जी.जे. १६, एवाय ००७८) ओव्हरटेकच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा होऊन त्या एकमेकांमध्ये अडकल्या.
धडक देणाऱ्या ट्रकमध्ये कोळसा होता. धडकेनंतर त्यातील कोळसा समोरील ट्रकवर जाऊन पसरला होता. शिवाय ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने दोन्ही ट्रकचे चालक व एका ट्रकच्या क्लिनरला काढण्यासाठी दोन ते अडीच तास लागले.
ट्रकमधील कोळसा जेसीबीच्या सहाय्याने उपसण्यात आला व त्यानंतर ट्रक मागे ओढून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एक गंभीर आहे. टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला.