धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ

---Advertisement---

 

एरंडोल : विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरखेडी शिवारातील एका शेतात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखले झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.

एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात आदिवासी समाजातील एक कुटुंब वास्तव्यास आहे. दरम्यान, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास विजेचा शॉक लागून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वर्ष वय असलेली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.

अपघात की घातपात ?

प्रथम दर्शनीत, विजेचा शॉक लागून या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा अपघात की घातपात ? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यामुळे तपासाअंती याबाबत अधिक माहिती समोर येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---