तभा वृत्तसेवा रावेर: आमदार अमोल जावळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे रावेर एस.टी. आगाराला राज्य परिवहन मंडळाकडून पाच नवीन एसटी बस प्राप्त झाल्या असून, याबसचा लोकार्पण सोहळा बस स्थानकावर भाजपचे पदाधिकारी व आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. नवीन बस मिळाल्याने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
नारळ फोडून व विधिवत पूजन करून फीत कापून बससेवेचे उदघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे मान्यवर उपस्थित होते. तीन महिन्यापूर्वी आमदार जावळे यांनी बस स्थानकाला भेट देऊन प्रवाशी व अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तेव्हा बसची अपुरी संख्या असल्याने प्रवाशी सेवा देताना अडचणी येतात हे त्यांच्या लक्षात आले होते. याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यावर या बस प्राप्त झाल्या आहेत.
लोकार्पण सोहळ्यात उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आगारातर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सदस्य सुरेश धनके होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, आगारप्रमुख इम्रान पठाण, तहसीलदार बी. ए.कापसे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप पाटील, जिल्हा चिटणीस राजन लासुरकर, हरलाल कोळी, सी. एस. पाटील, तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष चेतन पाटील, महिला आघाडी अध्यक्षा आशा सपकाळे, वासुदेव नरवाडे,उमेश महाजन, मनोज श्रावक, बाळा आमोदकर, योगेश महाजन, अजिंक्य वाणी, संजय बुवा, रजनीकांत बारी, उमेश महाजन, विश्वजीत तेली, संदीप अडकमोल, पवन पाटील, प्रतिष नाईक, संजय तडवी, शाम भामरे, डी. बी. अटकाळे यांच्यासह अनेक यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड येथे बससेवेची मागणी
रावेर आगाराने रावेर येथून रायगडसाठी थेट नियमित बस सेवा सुरु करण्याची मागणी यावेळी डॉ. संदीप पाटील यांनी आगाराच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या या सूचनेला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यामुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल.लोकार्पण झालेल्या नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक चांगली, नियमित बससेवा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून मनःपूर्वक स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.