---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी व अजिंठा डोंगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील गिरणा व मन्याड धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढल्याने या दोन्ही नद्यांना पूर आला आहे त्यामुळे मन्याड व गिरणा नदीकाठच्या गावांनाही प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी परिसरात असलेल्या उतावळी नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी चक्क जेसीबीचा आधार घ्यावा लागला आहे.
---Advertisement---








