---Advertisement---

पीठ गिरणी चालकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

---Advertisement---

जळगाव : पीठ गिरणी चालकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. प्रभाकर कडू पाटील (६५ ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फैजपूर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रभाकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, बुधवारी त्यांचा मृतदेह तापी पात्रात आढळला. फैजपूर उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार मोती पवार, विकास सोनवणे यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढत यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. मृताच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. हवालदार मोती पवार यांच्या खबरीनुसार फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment