Flying Kiss Controversy : राहुल गांधींना चित्रा वाघ यांचा सल्ला, वाचा काय म्हणाल्या आहे?

 मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरीव चर्चेदरम्यान भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणानंतर वाद निर्माण झाला. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, भाजप आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी विनंती केली. याबाबत भाजपच्या अनेक महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या आहे चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, लोकशाहीच्या मंदिरात निंदनीय घटना घडल्या. मणिपूरचा मुद्दा मांडत असताना राहुल गांधी यांना फ्लाईंक कीस केला. त्यांच्या कृत्याला ठाकरे गट आणि काँग्रेसने समर्थन दिले. रोड रोमियो आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर देखील त्यांची मानसिकता तशीच आहे.

सोनिया गांधी यांना आम्ही विनंती केली आहे की राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे लग्न करुन टाका. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांचे लग्न होणे गरजेचे आहे. कधी डोळे मारतात, कधी कधी मिठी मारतात, आता फ्लाईंग किस केला. लोकशाहीचे मंदीरात अनेक निर्णय घेतले जातात. त्या ठिकाणी अभद्र कृती शोभत नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.