TDS Workshop: जळगावला टिडीएस कार्यशाळा: टिडीएससाठी डिटेक्ट, डिपॉझिट, डिक्लेअर या त्रिसुत्रीचा अवलंब करा

TDS Workshop: जळगाव : टिडीएससाठी डिटेक्ट, डिपॉझिट, डिक्लेअर या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. त्याचा फायदा तुम्ाच्यासह शासनास होईल. असे मत नाशिक विभागाचे टिडीएसचे अतिरीक्त आयुक्त संजय धिवरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयकर विभागातर्फे आयोजित टिडीएस कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित उपस्थित होते. आयकर अधिकारी टिडीएस मनू भारव्दाज यांनी कार्यशाळेत टिडीएसबाबत माहिती दिली.

कार्यशाळेत सादरीकरण मधु पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाशिक विभागाचे टिडीएसचे अतिरीक्त आयुक्त संजय धिवरे यांनी सांगीतले की, टिडीएस बाबत 3 ‌‘डि’ चे सूत्र लक्ष्ाात ठेवावे. यात डिटेक्ट म्हणजे कापणे, डिपॉझिट म्हणजे भरणे आणि डिक्लेअर म्हणजे त्रैमासिक विवरण सादर करणे. या तीन बाबीची तंतोतंत अंमलबजावणी केली तर शासनासह तुम्हालाही त्याचा फायदा होईल असे सांगत चित्रफितीव्दारे सादरीकरण केले. सोबतच टिडीएस बाबत उपस्थितांना असलेल्या शंका व अडचणींचे निरसणही त्यांनी केले.
या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे बीडीओ, लिपीक, ग्रामसेवक असे 300 पेक्ष्ाा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.समारोपास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार उपस्थित होत्या. आयकर विभागातर्फे या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत त्यांनी आयकर विभागाचे आभार मानले.
कार्यशाळेसाठी आयकर विभागाचे आयकर अधिकारी मनू भारद्वाज, मधु पाटील, संजय गुप्ता, संदीप मेकलवार, विश्वास पाटील, सलमान खान, अतुल त्रिपाठी, दीपक बाबू यांनी सहकार्य केले.