उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

तरुण भारत लाईव्ह । १६ मार्च २०२३। उन्हाळा आला की उसाचा रस, लस्सी, ताक असे थंड पेय, रसदार फळं, शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर फळे तुम्ही ट्राय करू शकता.यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन चा त्रास होणार नाहीत. उन्हाळ्यात लोकांना खूप तहान लागते, त्यामुळे पाण्याचे सेवन वाढते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी फळेही जास्त प्रमाणात खावीत. शरीरातील पाण्याची ही कमतरता काही फळे आणि भाज्यांच्या सेवनानेही भरून काढता येते.

टरबूज किंवा कलिंगड
टरबूजमध्ये ९२ टक्के पाणी असते जे शरीरासाठी खूप उपयोगी असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील विविध अवयव निरोगी राहतात.

काकडी
काकडीतही भरपूर पाणी असते जे शरीराची पाण्याची गरज पूर्ण करते. काकडीत व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

ताजे संत्र
संत्र हे फळ मुळातच अत्यंत रसदार आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्याचा रस पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

डाळिंब
डाळिंबात पाणी तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फोलेट असते ज्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यास होतो. डाळिंबाचा रस पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. एवढे फायदे होणार असतील तर डाळिंब सोलण्याचा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही का?

सफरचंद
सफरचंदमध्येही भरपूर पाणी असते जे शरीरासाठी खूप उपयुक्त सिद्ध होते. सफरचंदात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम असते. याशिवाय सफरचंदात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे हृदय नेहमी निरोगी राहते.