उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। वाढत्या गरमीने सगळेच हैराण झालेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. उन्हाळ्यात कुलर लावला तरी तेवढ्यापुरतं घर थंड रहात. नंतर पुन्हा गर्मी जाणवू लागते. यासाठी उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. यामुळे घर थंड राहील. नैसर्गिकरित्या घरं कसं थंड ठेवाव हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

नैसर्गिक सावली मिळावी यासाठी घराच्या अंगाणात झाडं लावावी. झाडाच्या सावलीमुळे घरात नैसर्गिकरित्या थंडावा मिळेल. घराच्या बाल्कनीत आणि ओट्यावर झाडांच्या कुंड्या ठेवाव्या. स्पायडर प्लांट, कोरफड, पाम ट्री यासारखी घरात झाडं ठेवू शकता. त्यामुळे हवा शुद्ध होण्याबरोबर थंडावा मिळण्यास मदत होईल.

टेबल फॅनसमोर बर्फाने भरलेला वाटगा ठेवावा. जेणेकरून थंड हवा येईल. तसेच खिडक्या आणि दारावर रात्री आणि दुपारी भिजलेले कपडे ठेवावे. उन्हाळ्यात घरात हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीट वापरावे. घरात कमीत कमी फर्निचर वापरा. त्यामुळे हवा मोकळी होण्यास मदत होते. सूर्याच्या विरुद्ध दिशेने असलेली खिडक्या दारं उघडी ठेवा. यामुळे घरात उष्णता येणार नाही.  यामुळे घरात थंडावा राहण्यास मदत होईल.