तरुण भारत लाईव्ह । ०२ फेब्रुवारी २०२३। मोबाईल हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. मोबाईल मध्ये आपली वैयक्तिक माहिती असते आपले बँकिंग डिटेल्स असतात. आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर खूप अडचणी येऊ शकतात. अशावेळी काही टिप्स आपण फॉलो केल्या तर तुमचा मोबाईल परत मिळण्यास सोपे होईल.
जर तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर IMEI नंबरच्या मदतीने सरकारी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रीला भेट देऊन तुमचं डिव्हाइस म्हणजेच फोन ब्लॉक करू शकता. आपला पर्सनल डेटा जर चुकीच्या हातात गेला तर मोठं नुकसान होऊ शकत. यासाठी तुम्हाला तुमचे सिम कार्ड ब्लॉक करावे लागेल. बँकिंग अॅप्समध्ये सिक्युरिटी पिन आणि लॉक असतो. पण तरीही, सावधगिरी म्हणून तुमचे पासवर्ड बदला. किंवा संबंधित बँकांना फोन करून व्यवहार थांबविण्याबाबत सांगा.
मोबाईल परत मिळण्यासाठी स्मार्टफोन च्या फाइन्ड माय डिवाइस फीचरद्वारे फोन ट्रॅक करणं खूप सोपं झालंय. पण फोन ऑनलाइन असताना त्याचं लोकेशन फक्त तुम्हीच पाहू शकाल. त्याचप्रमाणे फोन बंद केल्यावर फोनचं शेवटचं लोकेशन युजर्सना दिसतं. आपण सोशल मीडिया वर सक्रिय असतो आणि मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्ही तुमचे सोशल मीडिया चे पासवर्ड बदलले पाहिजे.