माफी मागायला भाग पाडा !

अग्रलेख

सा-या जगातील अद्वितीय आणि शूर अशा क्रांतिकारकांमध्ये ज्यांचा समावेश केला जातो, असे थोर विचारवंत, लेखक, कवी, इतिहासकार आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली अपमानजनक वक्तव्यांची मालिका थांबवण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली. swatantryveer sawarkar शरद पवार हे धोरणी नेते आहेत आणि त्यांना कधी कुठे शांत राहायचे किंवा माघार घ्यायची हे कळते, असे लोक म्हणतात ते उगाच नव्हे. काँग्रेस त्यांचा सल्ला ऐकेल अशी शक्यता आहे. swatantryveer sawarkar राहुल गांधी यांनी त्यांना तशी हमी दिली आहे, असे म्हणतात. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तीन पक्षांचे ऐक्य टिकवण्यासाठी शरद पवारांनी हा पवित्रा घेतला आहे. swatantryveer sawarkar कारण, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-या काँग्रेसच्या सोबत राहणे आधीच अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवडणारे नाही.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवरची उद्धवजींच्या गटाची नाराजी आधीपासूनच स्पष्ट आहे. swatantryveer sawarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावर महाविकास आघाडीतील ऐक्य संपुष्टात येऊ शकते आणि एकूणच विरोधकांचे सारे मनसुबे अडचणीत येऊ शकतात, हे हेरण्याइतपत चाणाक्षपणा शरद पवारांकडे आहे. त्यामुळे त्यांनी हा विषय काँग्रेसपुढे नेला आणि हा वाद शमविण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्यांच्या या पवित्र्याचा किंवा मध्यस्थीचा विचारांशी किंवा तत्त्वांशी संबंध आहेच, असे खात्रीपूर्वक म्हणता येण्याजोगी परिस्थिती नाही. शरद पवारांचे राजकारण मोसमी असते. स्वत:चा आणि पक्षाचा फायदा सर्वात आधी पाहतात. त्यामुळे त्यांची भूमिका सतत बदलत असते. swatantryveer sawarkar शरदराव जे सांगतात ते कधीच होत नाही आणि ते ज्याबद्दल कधीच बोलत नाहीत, तेच घडते, असा लोकांचा जो समज आहे, तो खरा ठरवण्याची काळजी स्वत: शरद पवार घेतात. उदाहरणार्थ, एकीकडे ते काँग्रेसवर टीका करतात आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत सत्ता स्थापन करतात. सोनिया गांधी यांच्याकडे असलेले काँग्रेसचे नेतृत्व त्यांना मान्य नसते, त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडतात. swatantryveer sawarkar पण, संधी मिळाल्याबरोबर सोनियाजींच्या काँग्रेस पक्षासोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसतात. एकीकडे ते भाजपाला धारेवर धरतात आणि कधी तरी अचानक भाजपाला पाठींबाही देतात. swatantryveer sawarkar एकेकाळचे शिवसेनेचे टीकाकार असलेले शरद पवार हे आता उद्धव ठाकरे यांचे पाठीराखे आहेत.

शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष यांचा संबंध केवळ सत्ताकारणाशी आहे. swatantryveer sawarkar तसा तो काँग्रेसचाही आहे आणि आता उद्धवजींच्या शिवसेनेचाही आहे. विचारांशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. संधी मिळेल तेव्हा उच्चरवाने शाहू-फुले-आंबेडकर म्हणायचे, पुरोगामी महाराष्ट्राचे दाखले द्यायचे आणि एरवी भ्रष्टाचारी-अनाचारी लोकांच्या पखाली वाहायच्या ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची पद्धतच आहे. तरीही हे दोन पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तिघे एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून महाराष्ट्राची सत्ता प्राप्त केली. swatantryveer sawarkar काही महिन्यांपूर्वी सारीपाटावर हालचाली झाल्या आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली. आता हे तिन्ही पक्ष कासावीस झालेले आहेत. कारण, त्यांच्याकडे सत्ता नाही. पुन्हा सत्तेत यायचे असेल तर भाजपाला सामोरे जावे लागेल आणि तशी यातल्या कोणत्याच एकट्या पक्षाची तयारी नाही, हे वास्तव आहे. swatantryveer sawarkar भाजपाला सामोरे जायचे तर तिन्ही पक्ष एकत्र हवेत आणि ते एकत्र असले तरच काही जमण्याची शक्यता आहे, हे शरद पवारांना अतिशय चांगले कळते. त्यांच्या मध्यस्थीमागे खरे कारण आहे ते हे!

swatantryveer sawarkar काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने वायफळ वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. त्यावेळीही त्यांचा निषेध झालाच. आता त्यांच्या त्या मुक्ताफळांचे कवित्व शिल्लक असतानाच अलीकडेच त्यांची खासदारकी गेली. एका न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि लागोपाठ त्यांचे लोकसभा सदस्यत्व गेले. swatantryveer sawarkar नंतर मुद्दा आला माफी मागण्याचा तर ‘मी गांधी आहे, सावरकर नाही,’ असा भलताच सूर राहुल गांधींनी आळवायला सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांत कधीही ताळतंत्र नसते. ते प्रचंड गोंधळलेले व्यक्तिमत्त्व आहे. पण, ते गांधी असल्यामुळे व पंडित जवाहरलाल नेहरू-इंदिराजी यांच्या घराण्यातले असल्यामुळे काँग्रेसचे नेते आहेत. खरे तर त्यांनी गांधी असण्याबद्दल(च) ईश्वराचे आभार मानले पाहिजे. सावरकर होण्याची त्यांची पात्रता नाही. महात्मा गांधी यांच्या योगदानाचा विचार केला तर त्यांना गांधी आडनावदेखील शोभत नाही. पण, ते त्यांच्या सुदैवाने गांधी आहेत. swatantryveer sawarkar कारण, राजीव आणि सोनिया गांधी या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. अशा माणसाने स्वतःची तुलना सावरकरांशी करणे आणि त्यातही माफीचे खुसपट काढणे, हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उपमर्दच आहे आणि त्यांनी त्याबद्दल माफी मागणे, हाच हा वाद संपवण्यावरील उपाय आहे.

swatantryveer sawarkar राहुल गांधी विदेशात शिकले आहेत, असे म्हणतात. मात्र, त्यांचे शिक्षण काहीसे अपुरे राहिलेले दिसते. त्यांना सावरकरांचे योगदान माहिती नाही, असे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातील क्रांतिकारकांमध्ये अद्वितीय होते. बालपणापासून अतिशय हुशार असलेले सावरकर तरुणपणी देशासाठी प्राणांची बाजी लावून लढले. swatantryveer sawarkar त्यांनी तुरुंगवास आणि हालअपेष्टा भोगल्या. अनेक लेख, कविता लिहून त्यांनी साहित्याच्या दालनातही मोठी भर घातली. तुरुंगात एकांतवासात असताना तिथल्या भिंतींवर कविता लिहिणा-या सावरकरांनी त्या हजारो ओळी मुखोद्गत करून पुन्हा लिहून काढल्या. या केवळ दंतकथा नाहीत. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ हे काव्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद्रकिना-यावर लिहिले. swatantryveer sawarkar ती घटना १९०९ च्या डिसेंबर महिन्यातली. त्यावेळी राहुल गांधींचा जन्मही झालेला नव्हता. त्यांच्या आजी इंदिराजीदेखील जन्माला यायच्या होत्या. देशावर इंग्रजांचे राज्य होते. देशभक्तांवर अत्याचार सुरू होते. त्यांच्या वाट्याला सातत्याने हालअपेष्टा आणि तुरुंगवास येत होता. अशा काळात स्वातंत्र्यवीरांनी ही कविता लिहिली. swatantryveer sawarkar आपल्या मायभूमीप्रती इतके आर्त-अनावर प्रेम असलेल्या कविहृदयाच्या क्रांतिकारकाच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार राहुल गांधी यांनाच नव्हे तर इतर कुणालाही नाही.

सावरकरांची बुद्धिमत्ता प्रखर आणि तेजस्वी होती. swatantryveer sawarkar त्यांचे वाचन, व्यासंग अतिशय दांडगे होते. त्यांच्या पासंगालादेखील आजच्या काँग्रेसचा कोणताच नेता बसू शकत नाही. अशा उठवळांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अपमानजनक वक्तव्ये करावीत, हे कदापिही सहन करण्याजोगे नाही. तरीही राजकीय सामंजस्याचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे योग्य नव्हे, असे काँग्रेसला सांगितले आणि असे होत राहिले तर सावरकरांप्रती प्रचंड प्रेम असलेल्या महाराष्ट्रात विरोधकांचे ऐक्य धोक्यात येईल, असा इशाराही दिला. swatantryveer sawarkar या त्यांच्या भूमिकेत सामंजस्य असेल. शिवाय, त्यात राजकीय शहाणपणदेखील आहे. वास्तवात प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की, आपले इतिहासपुरुष ही देखील माणसेच होती. त्यांना सामाजिक आदर्शांच्या ठिकाणी राहू देणे आणि आपले नवे आदर्श प्रस्थापित करणे ही राजकारणाची व समाजकारणाची दिशा असली पाहिजे. swatantryveer sawarkar इतिहासपुरुषांना नायक किंवा खलनायक ठरवून वर्तमानातील कोणताच प्रश्न सुटू शकत नाही.

r उलट राजकारणाच्या निमित्ताने सामाजिक प्रश्नांवर जी साधक-बाधक चर्चा व्हायला हवी, ती करण्याची संधी विरोधक व सत्ताधारी गमावतात. परिणामी लोकांचे प्रश्न तसेच राहतात. पण, तो उठवळपणा राहुल गांधी यांनी केला. शरद पवारांनी हा विषय बाजूला ठेवण्याचा सल्ला काँग्रेसला दिला आहे. swatantryveer sawarkar सावरकर यांना लक्ष्य करून आपला फायदा होणार नाही, हे सांगतानाच आपले खरे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच आहे, हे शरद पवारांना काँग्रेसच्या लक्षात आणून द्यावे लागत असेल तर काँग्रेस पक्षाचे राजकीय आकलन कोणत्या स्तरावर आलेले आहे, याची कल्पना येते. ते जसे असेल, तसे असेल. पण, शरद पवारांनी सल्ला दिला असेल तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल राहुल गांधी यांनी अद्याप माफी मागितलेली नाही, हे वास्तव आहे. swatantryveer sawarkar ती त्यांनी मागितल्याखेरीज ख-या सावरकरभक्तांनी शांत बसू नये. सावरकरांच्या देशप्रेमापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करू पाहणा-यांना त्यांची जागा दाखवून देणे, हेही देशप्रेमच आहे.