घरात घुसून बळजबरीने अत्याचार, नराधमास आजन्म कारावासाची शिक्षा‎

 पारोळा : अल्पवयीन पीडितेवर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आरोपी नराधमाला जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली‎ असून हा निकाल आज बुधवारी‎ देण्यात आला आहे.‎

रविंद्र शामराव पाटील, वय ३९ रा. कन्हेरे ता. पारोळा, जळगाव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून १३ फेब्रुवारी २०२० रोजी पिडीतेची आई ही लग्नानिमित्ताने बाहेर गावी मुक्कामी गेले. पिडीता घरी एकटी असताना, रात्री ११ वाजता आरोपी रविंद्र शामराव पाटील याने मद्यपी करून पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला तसेच कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची व स्वतः मरून जाण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडितेनं पोलिसांत फिर्याद दिली, त्यानुसार आरोपी रविंद्र शामराव पाटील याचा विरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी आज बुधवारी जिल्हा न्यायाधीश 1 एस.बी.गायधनी यांचेपुढे कामकाज चालले.

त्यामध्ये सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी एकुण 11 साक्षीदार तपासले. पैकी पिडीताची साक्ष तसेच सरकारी पंच व पिडीतेची आई व डॉ. विदयेश जैन, डॉ.सुप्रिया खांडे, डॉ. गणेश पाटील यांची साक्ष व तसेच न्यायवैदयानिक विभाग नाशिक यांचेकडील डि.एन.ए व रक्त तपासणी अहवाल महत्वाचे ठरले. तपासी अधिकारी रविंद्र बागुल यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस सदरचा खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून गुन्हा सिध्द झालेने बाल लैगिक आत्याचार कलम 4 (2) प्रमाणे  मरेपर्यन्त आजन्म कारावासाची (जन्मठेपेची शिक्षा व रुपये 1000/- दंड व दंड नभरल्यास तिन वर्षे सश्रम कारावास, तसेच बाल लैगिंक आत्याचार कलम 6 प्रमाणे प्रमाणे मरेपर्यन्त आजन्म कारावासाची (जन्मठेपेची शिक्षा व रुपये 1000/- दंड व दंड नभरल्यास तिन वर्षे शिक्षा, तसेच भा.द.वि कलम 506 प्रमाणे 07 वर्षे सश्रम कारावास व 1000/- दंड व दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास. सदर आरोपी त्यांचे अटकेपासुन कारागृहात होता. या कामी पैरवी अधिकारी, उदयसिंग सांळुके व पो.कॉ. हिरालाल पाटील, अमळनेर यांनी काम पाहीले. सहा. सरकारी वकील के आर बागुल यांनी कळविले आहे.