धुळे : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नराधमाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या पीडित 34 वर्षीय महिलेने शहर पोलिसात फिर्याद दिली. 4 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राकेश मोहनलाल अग्रवाल (वय 35 रा. चक्करबर्डी रोड, भाईजी नगर, धुळे) याने पीडित महिलेच्या घरी जावून तिला शिवीगाळ व दमदाटी केली तसेच बळजबरीने अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित महिलेने शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी राकेश अग्रवाल याच्याविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आज दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पीएसआय डी.डी.धनवटे करीत आहे.