---Advertisement---

..अन् माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा थोडक्यात बचावले

---Advertisement---

बंगळगुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात पायलटच्या सतर्कतेमुळे टळला आहे. हेलिकॉप्टरच्या लँण्डींगच्या ठिकाणी पडलेल्या प्लास्टीक कचरा उडू लागला. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे येडीयुरप्पा थोडक्यात बचावले आहे.

भाजप नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर पक्षाने निवडणूकांची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, पक्षाने त्यांच्यावरच कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. याच पार्श्वभूमीवर मोटबांधणी, नेमणूका, नियुक्त्या आणि बैठकांचे सत्र सुरू आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये हेलिकॉप्टरच्या लँण्डींगवेळी त्या ठिकाणी पडलेल्या प्लास्टीक कचरा उडू लागला. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे येडीयुरप्पा थोडक्यात बचावले. लँण्डींगच्या ठिकाणी आजूबाजूच्या वस्तीतून जमा झालेल्या प्लास्टीक कचऱ्याचा खच या ठिकाणी साचला होता.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment