काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; वाचा सविस्तर

जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवार, २४ रोजी चारशे कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे.

 

https://fb.watch/pKbEFxPu2z/

 

रावेर तालुक्यातील मूळ विवरे येथील रहिवासी. सुरवातीपासूनच समाजकारणाची आवड असलेल्या डॉ. पाटील यांनी जळगाव शहरात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून गोदावरी हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा सुरू केली. नंतर विविध शैक्षणिक संस्थांचे मोठे नेटवर्क त्यांनी उभे केले आहे.

रावेर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार !

डॉ. पाटलांच्या भाजपमधील प्रवेशामुळे रावेर लोकसभा व पर्यायाने या क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे मानले जात आहे. डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्याचे राजकारण व आरोग्यसेवेतील लौकिकप्राप्त नाव. तीन-चार दशकांपासून ते जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे, विशेषतः गांधी परिवाराचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून कार्यरत आहेत.