अडावदला माजी आमदार सोनवणेंची भेट; ‘त्या’ बालकांच्या मृत्यूची घेतली दखल

अडावद, ता.चोपडा : तालुक्यातील कमळगाव येथील पिंप्री शिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच कुटुंबातील आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असून जिल्हा शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर कुटुंबांमधील सात जणांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज रविवारी येथील आरोग्य केंद्राला भेट देत याबाबतची चौकशी केली. जळगावला उपचार घेत असलेल्या पाच महिन्यांच्या बालिकेचीही प्रकृतीबाबत विचारणा केली.

महिनाभरातच दुसऱ्यांदा विषबाधा
महिनाभरातच दुसऱ्यांदा विषबाधा सदृष्य प्रसगांना चांदसणी, कमळगाव, पिंप्री या गावांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे या खेड्यापाड्यातल्या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

काळजीपूर्वक काम करण्याच्या सुचना
महिनाभरातच दुसऱ्यांदा विषबाधा सदृष्य प्रसगांना चांदसणी, कमळगाव, पिंप्री या गावांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक काम करण्याच्या सुचना माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे व उपस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावेळी पी.आर.माळी, सचिन महाजन, हरिष पाटील, नामदेव पाटील, वटारचे माजी सरपंच एम.जी.पाटील, प्रभाकर महाजन, भूषण देशमुख, लोकेश काबरा, रविंद्र देशमुख, पिक संरक्षक सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील, मनोहर पाटील, जावेद खान, अमोल कासार, पी.डी.महाजन, राहुल बैरागी, गणेश भोईटे आदी उपस्थित होते.