अमरावती : माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. सकाळी 9:30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंग शेखावत भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते.
माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे निधन
Updated On: फेब्रुवारी 24, 2023 12:02 pm

---Advertisement---
देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजरी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.