Rajiv Deshmukh Passes Away : माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, जळगाव जिल्ह्यात शोक

---Advertisement---

 

Rajiv Deshmukh Passes Away : चाळीसगावचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव अनिल देशमुख यांचे आज दि. 21 रोजी सकाळी 11 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांना आज दि. 21 रोजी सकाळी 11 वा. घरात हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ चाळीसगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यास सांगितले.

दरम्यान, धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जिल्ह्यात शोक व्यक्त होत असून, चाळीसगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ते आमदार

चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केल्यानंतर देशमुख हे २००९ ते २०१४ या कार्यकाळात चाळीसगाव विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---