---Advertisement---

माजी मिस्टर इंडिया ‘प्रेमराज अरोराचे’ हृदयविकाराच्या झटक्याने निधन

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २६ मे २०२३। मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी. प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना घडली तेव्हा ते कोटा येथे होते. असे सांगितले जात आहे की, काम केल्यानंतर तो वॉशरूममध्ये गेला होता. बराच वेळ तो बाहेर न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तपासणी केली तेव्हा तो वॉशरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कडक नियमांचे पालन करूनही प्रेमराज अरोरा यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रेमराजच्या कुटुंबीयांनी स्वतः सांगितले आहे की प्रेमराज अरोरा हा बॉडीबिल्डर असल्याने नेहमीच योग्य आहार घेत असे. तो सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहिला. प्रेमराज अरोरा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment