घरी एकटाच होता विराज, कुटुंबिय आले अन् समोरचं दृष्य पाहून हादरले!

---Advertisement---

 

धुळे : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापतीच्या मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. विराज शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील स्नेहनगर परिसरात महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे या त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा विराज शिंदे याने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना गुरुवारी (११ सप्टेंबर) रोजी घडली असल्याचे समोर आले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यामुळे विराजने अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने सर्वाना जबर धक्का बसला आहे.

एकटा असतानाच घेतला टोकाचा निर्णय

घटनेच्या दिवशी विराजचे कुटुंबीय बाहेर गावी असल्यामुळे तो घरी एकटाच होता. यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे कुटुंबीय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

विराजने का आत्महत्या केली ? याचे कारण अद्याप समोर आलेले नसून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---