former prime minister : सायफर प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इम्रान खान आणि मेहमूद कुरेशी यांच्यावरील सिफर खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर अत्यंत गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. त्याआधी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले आहेत.
सिफरचा हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर वैयक्तिक कारणांसाठी गुप्त माहितीचा वापर केल्याचा आरोप आहे.