नंदुरबार : नंदुरबारमध्ये शंभर खाटांचे माता आणि बाल रुग्णालयाची पायाभरणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज गुरुवार रोजी करण्यात आली आहे. नंदुबारसह गुजरात आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकांना या रुग्णालयाचा मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
तसेच नंदुरबार जिल्हा सातपुडाच्या डोंगररांगांवर वसलेला असून मोठ्या प्रमाणावर गर्भवत माता जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय नव्हता. आता शासनाकडून माता आणि बाल रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. 35 कोटी रुपये खर्च करून महिलांसाठी 100 खाटांचे हे रुग्णालय उभारले जात आहे.
या रुग्णालयांवर चांगले डॉक्टर मिळणार असून येणाऱ्या काळात या डॉक्टरांकडून जिल्ह्यात आरोग्य शिबिर घेतले जाणार आहेत. तर या रुग्णालयात अनेक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना याच्या मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे असेही मंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले.
याप्रसंगी डॉ.खा. हीना गावित, जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित, आ. आमश्या पाडवी यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.