---Advertisement---

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महामंडळाकडून सर्व विभागांना पत्र, जाणून घ्या काय आहे?

---Advertisement---

जळगाव : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. युनियनच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. आधी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने मोफत प्रवास सुविधा मिळत होती, मात्र आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कसा असेल मोफत पासचा कालावधी?

एसटी विभागाकडून आधी पहिले सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसरे सत्र जुलै ते डिसेंबरमध्ये एक महिन्याचा असा एकूण दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र आता या सुविधेत मोठी सुधारणा करत एका सत्रात दोन महिने असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे.

या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळेल. त्यामुळे कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

एसटी महामंडळाचे आदेश जारी

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी पत्र जारी केले आहे. यात सर्व एसटी विभागांना मोफत पास देण्याच्या कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. महामंडळाच्या या सकारात्मक निर्णयामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment