---Advertisement---

Chopda Bus Accident : एसटी बसने चौघांना चिरडलं, चोपड्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेक फेल झालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात रवींद्र बहारे (40) व सोनू रशीद पठाण (22) यांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची एसटी बस (क्र. MH 40, N9828) लासूरकडून चोपडा आगारात येत होती. मात्र, चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकिज परिसरात बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात रवींद्र बहारे (40) व सोनू रशीद पठाण (22) यांचा मृत्यू झाला असून, अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना तात्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तर ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षालाही धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान, राज्य परिवहन मंडळाच्या अनेक एसटी बस अक्षरशः ढासळण्याच्या स्थितीत रस्त्यावर धावत असल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे. परिणामी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, याकडे संबंधित वेळीस लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment