धक्कादायक : बायोगॅस टाकीची साफसफाई करताना चार जणांचा गुदमरून मृत्यु

तरुण भारत लाईव्ह । १५ मार्च २०२३। बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा गुदमरून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारा अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आटोळे कुटुंबीयातील तिघे, तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, प्रकाश सोपान आटोळे आणि बाबा पिराजी गव्हाणे यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्ताना स्थानिकांनी बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारा अगोदरच त्यांची प्राणजोत मावळ्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.