---Advertisement---

आरोपी एकटाच का होता ? अमली पदार्थाच्या सूत्रधाराच्या शोधासाठी चार पथके रवाना

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : चाळीसगावनजीक आढळून आलेल्या ६५ कोटी रुपये किमतीच्या अमली जप्तप्रकरणी प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळ्या दिशांना चार पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाशी परराज्यातील संबंध असल्याने त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे.

दिल्लीहून बंगरूळुकडे जाणाऱ्या कारमधून सुमारे ६५ कोटी रुपये किमतीचा अॅम्फेटामाइनसह ४२ किलो ड्रग्ज साठा चाळीसगाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ गुरुवारी रात्री पकडण्यात आला होता. या प्रकरणातील अटकेत आरोपी कोणत्या कंपनीसाठी किंवा व्यक्तीसाठी काम करीत आहे.

याबाबत चौकशी सुरू आहे. त्याशिवाय यामध्ये आणखी कोणकोण सामील आहे, जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ कोणाकडे जात होते आणि गाडीत आरोपी एकटाच का होता, याबाबत तपास केला जात असल्याची माहिती तपास अधिकारी अमितकुमार मनेळ यांनी दिली.

अटकेतील कारचालक अब्दुल आसिम सैय्यद (वय ४८, रा. ए-२६३, तिसरा मजला, बटला हाऊस, जमिया नगर, ओखला, नवी दिल्ली) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारच्या मागील सीटवर काय आहे असे विचारले असता, त्याने रासायनिक पदार्थ असल्याची कबुली दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment