---Advertisement---

मोठी बातमी! चार हजार सैनिकांनी तीनशे नक्षलवाद्यांना घेरले, ४८ तासांपासून गोळीबार सुरूच

---Advertisement---

छत्तीसगड : पहलगामच्या घटनेनंतर छत्तीसगडच्या बिजापूर आणि तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ४००० हून अधिक सैनिकांचा समावेश आहे. सैनिकांनी ३०० हून अधिक नक्षलवाद्यांना घेरले आहे, ज्यात नक्षलवादी नेते हिडमा, देवा, सुधाकर यांचा समावेश आहे. सैनिकांनी कारगेटा, नाडपल्ली, पुजारी कांकेरच्या टेकड्यांवर नक्षलवाद्यांना घेरले असून, ४८ तासांपासून अधूनमधून गोळीबार सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईत तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील सुरक्षा दल सहभागी आहेत. हा परिसर नक्षलवाद्यांचा सुरक्षित आणि मुख्य भाग मानला जातो. असेही मानले जाते की, या भागात बटालियन क्रमांक १ आणि २ सह नक्षलवाद्यांच्या इतर कंपन्या आहेत. सैनिकांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे कडक उष्णता आणि नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी. या चकमकीवर ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे सतत लक्ष ठेवले जात असून, या ऑपरेशनसाठी सैनिक एका आठवड्याचा रेशन घेऊन गेले असल्याची समोर आली आहे.

हा एक मोठा डोंगराळ प्रदेश असून, मोठ्या भागात पसरलेला आहे. या संपूर्ण ऑपरेशनवर तेलंगणामधून लक्ष ठेवले जात आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी आणि विजापूरचे एसपी जितेंद्र यादव सतत लक्ष ठेवून आहेत. या ऑपरेशनमध्ये अनेक हाय-टेक उपकरणे देखील वापरली जात आहेत.

राज्याचे गृहमंत्री या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. हे ऑपरेशन तीन राज्यांच्या समन्वित रणनीती अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे त्या भागात पर्वतरांगा आहेत, ज्यांचे क्षेत्रफळ २८० चौरस किलोमीटर असल्याचे सांगितले जाते.

नक्षलवादी या परिसरातील गावांमधून अन्नधान्य मिळवत होते, पण आता सुरक्षा दलांनी हे जाळे तोडले आहेत. नक्षलवाद्यांना आधीच माहित होते की, सैन्य या भागाकडे येईल, म्हणून नक्षलवाद्यांनी या परिसरात आयईडी पेरले आणि गावकऱ्यांनाही याची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या सुरक्षा दलांनी या संपूर्ण प्रकरणावर अधिकृतपणे माध्यमांसोबत कोणतेही विधान शेअर केलेले नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment