Chandrakant Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. परंतु, अद्यापही त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नसल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?
मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यापासून मी किंवा सरकार मागे गेलेलो नाही. राज्यातली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे मुंबईत आज संध्याकाळपर्यंत तरी किमान किंवा दोन-तीन दिवस सुद्धा पदवीधर निवडणुकांमुळे आचारसंहिता आहे.
हा निकालानंतर ही आचारसंहिता संपेल. मग याबाबत मुंबईमध्ये बसून निर्णय घेतला जाईल. आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा अनेक योजना आगामी काळात येतील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.