गेल्या काही वर्षांपासून महागाईने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. भाजीपाला, डाळी-धान्य, इंधन अशा प्रत्येक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. मात्र, भारत पेट्रोलियमने (BPCL) ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे.
काय आहे भारत पेट्रोलियमची विशेष ऑफर?
भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर दुचाकी वाहनधारकांना 75 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. तसेच, भाग्यवान ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅकही जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानवर विजय अन् टीम इंडियाला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC कडून मोठी घोषणा
ही ऑफर कोण आणि कशी घेऊ शकतो?
ही ऑफर केवळ दुचाकी वाहनधारकांसाठी लागू आहे.
ग्राहकाचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
भारत पेट्रोलियमचे कर्मचारी, डीलर्स, वितरक आणि त्यांच्या कुटुंबियांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.
ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या ऑफर्सवर कायदेशीर बंदी आहे, त्या ठिकाणी ही ऑफर लागू होणार नाही.
ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल?
ग्राहकांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकृत पेट्रोल पंपावर MAK 4T इंजिन ऑईलचे कमीत कमी एक पॅक खरेदी करणे आवश्यक आहे.इंजिन ऑईल खरेदी केल्यावर 75 रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाईल.
ग्राहकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक पेट्रोल पंपावर नोंदवावा लागेल.
इंजिन ऑईलच्या डब्ब्यावर दिलेला QR कोड स्कॅन केल्यावर 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या अटी आणि नियम
एका मोबाईल क्रमांकावर ही ऑफर फक्त एकदाच लागू होईल.
एकदा ऑफरचा लाभ घेतल्यावर, दुसऱ्या पेट्रोल पंपावर ही ऑफर परत घेता येणार नाही. ग्राहक इंजिन ऑईल पेट्रोल पंपावर मोफतपणे बदलवू शकतात.
ही ऑफर जाहीर होताच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. मोफत पेट्रोल आणि कॅशबॅकच्या आशेने अनेक दुचाकीस्वार पेट्रोल पंपावर विचारणा करत आहेत. भारत पेट्रोलियमच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आणलेली ही ऑफर ग्राहकांना कितपत लाभदायक ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या जवळच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर जाऊन तुम्ही देखील या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकता!